मार्केटयार्डातील गुळ-भूसार व्यापाऱ्यांचा २५ फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संप

पुणे | मार्केटयार्डातील गुळ-भूसार विभागातील व्यापाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांकडे बाजार समिती तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (२५ फेब्रुवारी) एक दिवसाचा लाक्षणिक संप दि पूना मर्चंट्स चेंबरने पुकारला आहे. दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी ही माहिती दिली आहे.

मार्केटयार्ड गुळ-भूसार विभागातील सभासदांच्या तक्रारींबाबत संबंधित प्रशासनास यापूर्वी प्रत्यक्ष भेटून तसेच लेखी स्वरूपात वारंवार अवगत करण्यात आले होते. यात मालाची चोरी, वाहतूक समस्या आणि अस्वच्छता या या गोष्टींकडे चेंबरने बाजार समितीचे लक्ष वेधलेले होते. या समस्यांवर तातडीने निर्णय होऊन त्यांचे निराकरण होणे अपेक्षित होते. मात्र, समस्यांचे निराकरण होण्याऐवजी त्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे सभासदांना दैनंदिन व्यवसाय करणे अत्यंत कठीण होत आहे.

या पार्श्वभूमीवर सभासदांच्या विविध समस्या व तक्रारींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी गुळ-भूसार विभागातील सर्व व्यावसायिक आपले व्यवहार बंद ठेवून निषेध नोंदविणार आहेत. याबाबतचा निर्णय दि पूना मर्चंट्स चेंबरच्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या कार्यकारिणी सभेत एकमताने घेण्यात आला आहे, अशी माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.

बाठिया म्हणाले,”मार्केट यार्ड गुळ भूसार विभागात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सभासदांच्या दुकानांमध्ये वारंवार चोरी होत असून त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. तसेच सुरक्षा ठेकेदारामार्फत सभासदांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याबाबत पूर्वी झालेल्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्याच प्रमाणे वाहतूक समस्या, अस्वच्छता यांसारख्या समस्यांना व्यापाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे.” 

सभासदांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस उपाययोजना करून समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा चेंबरने दिला आहे.

Share this article
Shareable URL
Prev Post

उन्हाळ्यात सनस्क्रीन लावणं खरंच आवश्यक आहे का?

Next Post

श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या अध्यक्षपदी जयंत शहा

Read next

लोकसेवा ई स्कूलची जेईई मेन्स मध्ये ऐतिहासिक कामगिरी; सिद्धार्थ आठल्येला 100 टक्के गुण

अतेन पांचभुडे द्वितीय (99.98), तर हर्षित शाह तृतीय (99.83)पुणे | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पाषाण येथील लोकसेवा…