४५० दृष्टीबाधितांना दिवाळी शिधा वाटप

द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा यांचा उपक्रम

पुणे : द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ४५० दृष्टीबाधित व्यक्तींना दिवाळी शिधा वाटप करण्यात आले.

सिंहगड रस्ता येथील शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रमात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुणे शहर व परीसरातील दृष्टीबाधित व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. याप्रसंगी द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा, कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया रोटरी क्लब पुणे शनिवारवाडाचे अध्यक्ष दिनेश जोशी, प्रकल्प संचालक श्रीनिवास पाळंदे, नारायण चांडक, अभिनव सेवा फाऊंडेशनचे सुनील गोवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. कश्मिरा ठाकर व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दृष्टीबाधित व्यक्तींची ‘दिवाळी’ आनंदाची व्हावी यासाठी गेली अनेक वर्षे नियमितपणे हा उपक्रम  राबविला जात आहे. द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन ही सामाजिक संस्था १९५२ पासून दृष्टीबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करीत आहे.

Share this article
Shareable URL
Prev Post

भारती विजय भंडारी यांना ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान

Next Post

जीतो पुणे चॅप्टरचा दिवाळी मीट कार्यक्रम दिमाखात संपन्न!

Leave a Reply
Read next

ढोल ताश्याचा गजर आणि मातेच्या जयघोषात माँ आशापुरा माता मंदिरातील शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

अभिषेक, नवचण्डी महायज्ञ, भजन जैमिंगसह माता की चौकी व पुणे गॉट टॅलेंट कार्यक्रमांचे आयोजन पुणे । महिला ढोल ताशा…

दि पूना मर्चंट्स चेंबरच्या पाठपुराव्याला यश; यूपीआयवरील एमडीआर शुल्काची अंमलबजावणी दिवाळीनंतर

निर्णयाचे स्वागत; मात्र शुल्क पूर्णपणे रद्द होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार : राजेंद्र बाठिया पुणे |…

लायंस क्लब ऑफ पूना गणेशखिंड के नए पदाधिकारियों का भव्य पदस्थापना समारोह संपन्न

पुणे | रैडिसन होटल, गोवा में लायंस क्लब ऑफ पूना गणेशखिंड के लायन वर्ष 2026–27 के नव-निर्वाचित पदाधिकारियों एवं…