मार्केटयार्डातील गुळ-भूसार व्यापाऱ्यांचा २५ फेब्रुवारीचा लाक्षणिक बंद स्थगित

पुणे | मार्केटयार्डातील गुळ-भूसार विभागातील व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांकडे बाजार समितीचे तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप दि पूना मर्चेंटस् चेंबरचे पुकारला होता. व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत पणन संचालकांनी दि पूना मर्चेंटस् चेंबर व कृषी उत्पन्न बाजार समिती यांची एक संयुक्त बैठक गुरुवारी २६ फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे. त्यामुळे सदरचा बंद स्थगित करण्यात आला आहे.

मार्केटयार्डातील गुळ-भूसार विभागातील वाढत्या समस्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सदर बैठकीमधून समाधानकारक मार्ग न निघाल्यास व्यापारी सभासदांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.

Share this article
Shareable URL
Prev Post

श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या अध्यक्षपदी जयंत शहा

Next Post

लग्न सोहळ्यात पुस्तक व रोप देऊन अनोखा सामजिक उपक्रम

Read next

राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या एका जागेसाठी विक्रम काकडेंसह चार जणांमध्ये रस्सीखेच

विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा पुणे | विधान परिषदेच्या नऊ…

अवघ्या ६० तासांत तब्बल ६००+ फ्लॅट्सचे बुकिंग व ६०० कोटींहून अधिकची विक्री

कोलते पाटील डेव्हलपर्सची रिअल इस्टेटमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद व्यान अॅट द रिझर्व्ह प्रीमियम २ व ३ बेडरुम…

दि पूना मर्चंट्स चेंबरच्या पाठपुराव्याला यश; यूपीआयवरील एमडीआर शुल्काची अंमलबजावणी दिवाळीनंतर

निर्णयाचे स्वागत; मात्र शुल्क पूर्णपणे रद्द होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार : राजेंद्र बाठिया पुणे |…