टी२० विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया आऊट, २००९ नंतर पहिल्यांदाच साखळी फेरीत बाद

कोलंबो | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बलाढ्य समजला जाणारा ऑस्ट्रेलियाचा संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. झिम्बाब्वेने ऑस्ट्रलियाला हरवलं. त्यानंतर काल श्रीलंकेने पण कांगारूंचा पराभव केला. यासोबतच झिम्बाब्वे आणि आयरलँड यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाल्यानं त्यांना एक एक गुण मिळाला होता. यामुळं ऑस्ट्रेलियासारखा तगडा संघ टी२० विश्वचषकातून बाहेर गेला आहे. 

टी२० विश्वचषकातून साखळी फेरीतून बाहेर जावं लागण्याची ऑस्ट्रेलियाची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २००९ मध्ये देखील ऑस्ट्रेलिया साखळी फेरीतच बाहेर पडला होता. ब गटात झिम्बाब्वेला सामना पावसामुळे रद्द झाल्याने एक गुण मिळाला आणि त्यांचे ५ गुण झाले. श्रीलंका यापूर्वीच सुपर ८ मध्ये दाखल झाला आहे. आणि आता त्यानंतर झिम्बाब्वे देखील सुपर ८ मध्ये पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलिया विश्वचषकातून बाहेर

टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत तीन सामने खेळलेत. यापैकी दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आणि एका सामन्यात विजय मिळाला. ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा झिम्बाब्वेने पराभूत केले त्यानंतर श्रीलंकाने हरवले. यामुळं तीन सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात केवळ २ गुण आहेत. तर, झिम्बाब्वेकडे ५ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाने उरलेल्या अखेरच्या सामन्यात ओमानवर विजय मिळवला तरी त्यांच्याकडे केवळ ४ गुण होतील. त्यामुळे ते झिम्बाब्वेच्या पुढं जाऊ शकत नाहीत. यामुळेच ऑस्ट्रेलियाचे या टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले.

झिम्बाब्वेला लॉटरी!  

टी२० विश्वचषकात इतिहासात प्रथमच झिम्बाब्वेचा संघ सुपर ८ मध्ये पोहोचला आहे. २०२२ मध्ये झिबॉम्बेनं सुपर १२ मध्ये प्रवेश मिळवला होता.

दरम्यान, पुढील टी२० विश्वकप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याकडून आयोजित केला जाणार आहे. यामुळे ते आपोआप पुढील टी२० विश्वचषकाला पात्र ठरले आहेत. आयसीसीच्या ट्रान्स टास्मन नियमानुसार सुपर ८ मध्ये दाखल झालेले संघ पुढील टी२० विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरतात. त्यानुसार झिम्बाब्वेला पुढील टी२० विश्वचषकासाठी पात्रता फेरी खेळावी लागणार नाही.

Share this article
Shareable URL
Prev Post

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? पालिकेच्या कक्षात दोन्ही पवारांचे फोटो

Next Post

अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

Read next