आमदार विक्रम काकडे पुन्हा नेमबाजीच्या मैदानात

नोव्हेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत होणार सहभागी

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे आता पुन्हा एकदा नेमबाजीच्या मैदानात उतरणार आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ते सहभागी होणार असून, त्यासाठी त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे.

नेमबाजी हा विक्रम काकडे यांचा जुना आणि अत्यंत आवडीचा खेळ आहे. पूर्वी त्यांनी नियमितपणे नेमबाजीचा सराव केला होता. मात्र विविध जबाबदाऱ्यांमुळे काही काळ या खेळापासून दूर राहिल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा बंदूक हाती घेत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.

नुकतीच त्यांनी टेंभुर्णी येथील माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे सुपुत्र आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज यशवंत शिंदे यांच्या जागतिक दर्जाच्या ट्रॅप आणि स्कीट नेमबाजी केंद्राला भेट दिली. यावेळी संजय मामा शिंदे यांनी त्यांचे अतिशय आपुलकीने स्वागत केले. या भेटीदरम्यान काकडे यांनी नेमबाजीचा सरावही केला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगितले.

“नेमबाजी हा माझ्यासाठी केवळ खेळ नाही, तर अनेक वर्षांपासून जपलेली आवड आहे. काही काळ त्यापासून दूर होतो, पण आता पुन्हा पूर्ण तयारीने सराव सुरू केला आहे. नोव्हेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच माझी ही जुनी आवड पुन्हा जोपासण्याचा प्रयत्न आहे,” असे विक्रम काकडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर काकडे यांनी आता नियमित सरावाला सुरुवात केली असून येत्या काही आठवड्यांत त्यांच्या सरावाची तीव्रता वाढविण्यात येणार आहे.

Share this article
Shareable URL
Prev Post

सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार

Next Post

मार्केट यार्ड गूळ-भुसार विभागातील ‘नो यूपीआय’ आंदोलन

Read next

अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा; आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

पुणे | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान…

मार्केटयार्डातील गुळ-भूसार व्यापाऱ्यांचा २५ फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संप

पुणे | मार्केटयार्डातील गुळ-भूसार विभागातील व्यापाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांकडे बाजार…

राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या एका जागेसाठी विक्रम काकडेंसह चार जणांमध्ये रस्सीखेच

विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा पुणे | विधान परिषदेच्या नऊ…

नवरात्र उत्सवानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात श्री देवीसूक्तम मंत्राचे सामूहिक पठण

पुणे | नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर गंगाधाम चौकातील प्रसिद्ध माँ आशापुरा माता मंदिरात शेकडो भक्तांच्या…