पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जीतो अ‍ॅपेक्सकडून मलेशियात होणारी ‘पॅट्रॉन मेंबर्स कॉन्क्लेव्ह’ रद्द

पुणे | अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना आवाहन केले. त्यामध्ये इंधन बचतीबरोबरच परदेशी प्रवास टाळून परदेशी चलन बचतीचेही आवाहन पंतप्रधानांनी केले. राष्ट्र प्रथम मानून पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जीतो अ‍ॅपेक्सने मलेशियामध्ये आयोजित केलेली ‘पॅट्रॉन मेंबर्स कॉन्क्लेव्ह’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जीतो अ‍ॅपेक्सचे चेअरमन पृथ्वीराज कोठारी व राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) ही जैन समाजातील उद्योजक, व्यापारी व प्रोफेशनल लोकांची सामाजिक संस्था आहे. संपूर्ण भारतासह विदेशातही जीतोचे चॅप्टर आहेत. जीतो अ‍ॅपेक्स ही जीतो संघटनेची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. त्यांच्या वतीने येत्या १४, १५ व १६ जुलै रोजी मलेशियामध्ये पॅट्रॉन सदस्यांची कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आली होती. यामध्ये १२०० जण सहभागी होणार होते. त्यांच्या विमान प्रवासाचे तिकिट, हॉटेल्स या सर्वांचे बुकिंग झाले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अमेरिका-इराण मध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी देशातील नागरिकांना आवाहन करण्यात आले. देशहिताला प्राधान्य देऊन देशातील नागरिकांनी इंधनाची बचत करण्याबरोबरच परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केले.

राष्ट्र प्रथम मानून मलेशिया दौरा रद्द
अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना इंधनाची बचत करण्याबरोबरच परदेशी प्रवास टाळण्याचेही आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्र प्रथम मानून आणि देशहिताला प्राधान्य देत जीतो अ‍ॅपेक्सने मलेशियाचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्याची संपूर्ण तयारी झाली होती. या दौऱ्यासाठी १२०० जणांच्या तिकिटांसह तेथील हॉटेल्सचे बुकिंग झाले होते. बिझनेस नेटवर्कींग हा या परिषदेचा उद्धेश होता, अशी माहिती जीतो अ‍ॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली.

Share this article
Shareable URL
Prev Post

राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या एका जागेसाठी विक्रम काकडेंसह चार जणांमध्ये रस्सीखेच

Next Post

जीतोतर्फे देशातील सर्वात मोठा विवाह परिचय सोहळ्याचे आयोजन

Read next

लायंस क्लब ऑफ पूना गणेशखिंड के नए पदाधिकारियों का भव्य पदस्थापना समारोह संपन्न

पुणे | रैडिसन होटल, गोवा में लायंस क्लब ऑफ पूना गणेशखिंड के लायन वर्ष 2026–27 के नव-निर्वाचित पदाधिकारियों एवं…