जीतो पुणेचे महिलांसाठीचे काम कौतुकास्पद – वैशाली कराड

पुणे : महिलांचे आरोग्य उत्तम असेल तर, कुटुंब उत्तम राहील. त्यामुळे महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे, व्यायामाकडे आणि आहाराकडे लक्ष्य देऊन जागरुक राहिले पाहिजे, असे आवाहन प्रसिद्ध उद्योजिका वैशाली कराड यांनी केले. जीतो पुणे लेडीज विंगच्या वतीने आयोजित केलेल्या ‘अंदाज – नारी, हर साज में एक नई कहानी’ या कार्यक्रमात वैशाली कराड प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी जीतो संघटनेचे महिला सक्षमीकरणासाठी आणि आरोग्यासाठी सुरु असलेले कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमादरम्यान वैशाली कराड यांनी उपस्थित महिलांना आरोग्य, योग्य आहार, नियमित व्यायाम व व्यावसायिक प्रगती या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. कामाचा दिवस असूनही हॉटेल शेरेटॉन येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांची अत्यंत लक्षणीय उपस्थिती लाभली होती.

जीतो पुणे लेडीज विंगच्या या दिमाखदार कार्यक्रमास लेडीज विंगच्या अध्यक्ष लतिका सांकला, मुख्य सचिव वंदना राठोड, सचिव अर्चना कोचर, खजिनदार नम्रता सिंघी, जीतो पुणेचे अध्यक्ष मनोज छाजेड, मुख्य सचिव जिनेंद्र लोढा, खजिनदार मंगेश कटारिया, सहखजिनदार प्रकाश ओसवाल, युथ विंगचे अध्यक्ष ऋषभ दुगड, मुख्य सचिव स्वराज पगारिया, उपाध्यक्ष रोहन सिंघवी, सल्लागार समितीचे विजय भंडारी, रविंद्र सांकला, चेतन भंडारी, प्रियांका परमार, लकीशा मर्लेचा, पूनम ओसवाल, एकता भन्साळी, रक्षा खिंवसरा, प्रिती छाजेड, शिल्पा कटारिया, शोभा दुगड, वंदना सोनिग्रा, मनाली सांकला, बबीता बोकाडिया, शोभा लोढा, प्रियांका ललवाणी, प्रतिमा दर्डा, आरती बाफना, मयुरी शिंगवी, ऐश्वर्या बलदोटा, कविता मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

“कामाच्या दिवशीसुद्धा इतक्या मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाला पाहायला मिळाली. महिलांचे आरोग्य या विषयीच्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन जीतो पुणे लेडीज विंगने केले. त्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन.”
-मनोज छाजेड (अध्यक्ष, जीतो पुणे)

“महिला ही आपल्या कुटुंब व्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम कसे राहील यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य, आहार, व्यायाम यासंबंधीत विषयांवर मार्गदर्शन मिळाले.”
-लतिका सांकला (अध्यक्ष, जीतो पुणे लेडीज़ विंग)

“महिलांविषयी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सर्व मान्यवर उपस्थित राहिल्याने आमचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे यापुढील काळातही असेच चांगले कार्यक्रम व उपक्रम करण्याचा आमचा मानस असेल.”
-वंदना राठोड (मुख्य सचिव, जीतो पुणे लेडीज विंग)

Share this article
Shareable URL
Prev Post

‘दिवाळी संध्या’ मधील सुरैल गीतांच्या मैफिलीत पुणेकर तृप्त!

Leave a Reply
Read next

मोदी सरकारचा स्टार्टअप साठी मोठा निर्णय; १० हजार कोटींचा निधी मंजूर 

दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्टार्टअप साठी मोठा निर्णय घेतला.…

ढोल ताश्याचा गजर आणि मातेच्या जयघोषात माँ आशापुरा माता मंदिरातील शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

अभिषेक, नवचण्डी महायज्ञ, भजन जैमिंगसह माता की चौकी व पुणे गॉट टॅलेंट कार्यक्रमांचे आयोजन पुणे । महिला ढोल ताशा…