अभिषेक, नवचण्डी महायज्ञ, भजन जैमिंगसह माता की चौकी व पुणे गॉट टॅलेंट कार्यक्रमांचे आयोजन
पुणे । महिला ढोल ताशा पथकाचे वादन, मातेचा जयघोष आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात धार्मिक पूजापाठ करून माँ आशापुरा माता मंदिरात घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवास आज सुरुवात झाली.
गंगाधाम चौक येथे माँ आशापुरा माता मंदिर असून कुलदेवी माँ आशापुरा मातेसह माँ महालक्ष्मी, माँ अंबा, माँ सच्चाई, माँ पद्मावती, श्री गणेशजी आणि श्री सोनाना खेतलाजी यांचे प्रकट देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथील नवरात्र उत्सवाचे हे नववे वर्ष आहे. यावर्षीच्या घटस्थापनेची पूजा नीलकंठ ज्वेलर्सचे संचालक दिलबाघसिंह बीर यांनी पत्नी नीलम बीर यांच्यासह केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, चेतन भंडारी, श्रीमती विमलाबाई भंडारी, भारती भंडारी, लीना भंडारी, शुभम भंडारी, श्याम खंडेलवाल, मंगेश कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.
या मंदिराचे पावित्र, येथील आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिभाव अपूर्व आहे. त्यामुळे दहा दिवसांच्या या नवरात्र उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख विजय भंडारी व चेतन भंडारी यांनी दिली.
या नवरात्र उत्सवामध्ये शृंगार आरती, महाआरती, शयन आरती, अभिषेक, नवचण्डी महायज्ञ, माता की चौकी, भजन जैमिंग, श्री सुक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्री देवी सूक्त मंत्र सामूहिक पठण, देवी सहस्रार्चन, पुणे गॉट टॅलेंट आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. नवरात्र उत्सवामध्ये दररोज सकाळी ६.३० वाजता आरती होणार असून ७ ते १० च्या दरम्यान अभिषेक होणार आहेत. नवचण्डी महायज्ञ दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ पर्यंत होणार आहे. सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार असून त्यानंतर देवीचे भजन जैमिंग, देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम माता की चौकी, पुणे गॉट टॅलेंट आदी कार्यक्रम होणार आहेत. याठिकाणी होत असलेला नवरात्र उत्सवदेखील खूप वेगळ्या स्वरुपाचा आणि समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी दर्शनासाठी येतात.
नवरात्र उत्सवातील कार्यक्रम
सोमवार, १२ ऑक्टोबर – माता की चौकी (अनुष्का एवं सिद्धार्थ भारद्वाज ग्रुप) – सायं. ७.३०
मंगळवार, १३ ऑक्टोबर – श्रीदेवी सुक्त पठण – दु. २
बुधवार, १४ ऑक्टोबर – पुणे गॉट टॅलेंट – सायं. ७.३०
गुरुवार, १५ ऑक्टोबर – श्री सुक्त पठण – स. ८.३०
शुक्रवार, १६ ऑक्टोबर – देवी सहस्त्रावर्तन – स.७
शुक्रवार, १६ ऑक्टोबर – नवदुर्गा सन्मान सोहळा – सायं. ७.३०
शनिवार, १७ ऑक्टोबर – भजन जैमिंग (दिशांत पारख ग्रुप) – सायं. ७.३०
रविवार, १८ ऑक्टोबर – भजन संध्या (गुरूकृपा व्हायोलिन ब्रेथलेस ग्रुप) – सायं. ७.३०
सोमवार, १९ ऑक्टोबर – कन्यापूजन – स. १०
नवरात्रात होणार मातेचा गजर!
अतिशय भक्तिभावात घटस्थापना होऊन आजपासून नवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे. या नवरात्र उत्सवात भक्तीच्या माध्यमातून देवीचा जागर होणार आहे. नवरात्र उत्सवात महिलांचा सन्मान करण्याची परंपरा माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टने जोपासली आहे. माँ आशापुरा माता मंदिरात होणाऱ्या नवरात्र उत्सवात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्वान महिलांचा नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी होणाऱ्या नवरात्र उत्सवात विविध उपक्रम व कार्यक्रम होणार आहे. याविषयीच्या अधिक माहितीसाठी माँ आशापुरा माता मंदिराच्या फेसबुक, इन्स्टाग्रामवरील संकेतस्थळाला भेट द्या. तसेच भाविकांनी यावर्षीही नेहमीप्रमाणे आशापुरा मातेचा आशिर्वाद घेण्यासाठी अवश्य यायचे आहे.
- विजय भंडारी (अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट)








