रविवारपासून माँ आशापुरा माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

अभिषेक, नवचण्डी महायज्ञ, भजन जैमिंगसह माता की चौकी व पुणे गॉट टॅलेंट कार्यक्रमांचे आयोजन

पुणे । गंगाधाम चौक येथे वसलेले माँ आशापुरा माता मंदिर हे आपल्या कुलदेवी माँ आशापुरा यांच्यासह माँ महालक्ष्मी, माँ अंबा, माँ सच्चाई, माँ पद्मावती, श्री गणेशजी आणि श्री सोनाना खेतलाजी यांचे एक प्रकट देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात. मंदिराच्या पवित्र परिसरातील आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिभाव अपूर्व आहे.

यावर्षीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला रविवारी (११ ऑक्टोबर) घटस्थापनेपासून सुरुवात होत आहे. यानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात तयारीला वेग आला असून दहा दिवसांच्या या नवरात्र उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख विजय भंडारी व चेतन भंडारी यांनी दिली.

रविवारी (११ ऑक्टोबर) सकाळी ९.४५ वाजता घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवास सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही खास महिलांच्या ढोल पथकाच्या गजरात घटस्थापना होणार आहे. या नवरात्र उत्सवामध्ये शृंगार आरती, महाआरती, शयन आरती, अभिषेक, नवचण्डी महायज्ञ, माता की चौकी, भजन जैमिंग, श्री सुक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्री देवी सूक्त मंत्र सामूहिक पठण, देवी सहस्रार्चन, पुणे गॉट टॅलेंट आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. नवरात्र उत्सवामध्ये दररोज सकाळी ६.३० वाजता आरती होणार असून ७ ते १० च्या दरम्यान अभिषेक होणार आहेत. नवचण्डी महायज्ञ दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ पर्यंत होणार आहे. सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार असून त्यानंतर देवीचे भजन जैमिंग, देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम माता की चौकी, पुणे गॉट टॅलेंट आदी कार्यक्रम होणार आहेत. याठिकाणी होत असलेला नवरात्र उत्सवदेखील खूप वेगळ्या स्वरुपाचा आणि समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी दर्शनासाठी येतात.

माँ आशापुरा नवरात्र उत्सवातील महत्वाचे कार्यक्रम
रविवार, ११ ऑक्टोबर – महिला ढोल पथकाच्या गजरात घटस्थापना – स. ९.४५
रविवार, ११ ऑक्टोबर – भजन जैमिंग (माथवा ड बैंड ग्रुप) – सायं. ७.३०
सोमवार, १२ ऑक्टोबर – माता की चौकी (अनुष्का एवं सिद्धार्थ भारद्वाज ग्रुप) – सायं. ७.३०
मंगळवार, १३ ऑक्टोबर – श्रीदेवी सुक्त पठण – दु. २
बुधवार, १४ ऑक्टोबर – पुणे गॉट टॅलेंट – सायं. ७.३०
गुरुवार, १५ ऑक्टोबर – श्री सुक्त पठण – स. ८.३०
शुक्रवार, १६ ऑक्टोबर – देवी सहस्त्रावर्तन – स.७
शुक्रवार, १६ ऑक्टोबर – नवदुर्गा सन्मान सोहळा – सायं. ७.३०
शनिवार, १७ ऑक्टोबर – भजन जैमिंग (दिशांत पारख ग्रुप) – सायं. ७.३०
रविवार, १८ ऑक्टोबर – भजन संध्या (गुरूकृपा व्हायोलिन ब्रेथलेस ग्रुप) – सायं. ७.३०
सोमवार, १९ ऑक्टोबर – कन्यापूजन – स. १०

नवरात्र उत्सवात होणार भक्तीचा जागर!
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवीला अनन्यसाधारण महत्व आहे. देवीची विविध रुपे आपल्याकडे आहेत. या देवींचा जागर व्हावा म्हणून नवरात्र उत्सव आपल्याकडे साजरा केला जातो. या नवरात्र उत्सवात देवीचा जागर व्हावा, तिची पूजा व्हावी म्हणून घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंतच्या नऊ दिवसांत तिची भक्तीच्या विविध माध्यमातून उपासना केली जाते. आपल्या संस्कृतीमध्ये आपण आपल्या महिलांमध्ये देवीचे रुप पाहतो. त्यामुळे नवरात्र उत्सवात महिलांचा सन्मान करण्याची परंपरा माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टने जोपासली आहे. माँ आशापुरा माता मंदिरात होणाऱ्या नवरात्र उत्सवात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्वान महिलांचा नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी होणाऱ्या नवरात्र उत्सवात या विविध उपक्रम व कार्यक्रमांबरोबरच पुणे गॉट टॅलेंट हा विशेष कार्यक्रम होणार आहे. वय वर्षे ७ ते १४ आणि १४ पेक्षा अधिक या दोन वयोगटात इच्छुक आपला सहभाग नोंदवू शकतात. त्यासंबंधी माँ आशापुरा माता मंदिराच्या फेसबुक, इन्स्टाग्रामवरील अधिक संकेतस्थळावर माहिती दिली आहे. भाविकांनी यावर्षीही नेहमीप्रमाणे आशापुरा मातेचा आशिर्वाद घेण्यासाठी अवश्य यायचे आहे.

  • विजय भंडारी (अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट)

    Share this article
    Shareable URL
    Prev Post

    जीतो पुणेच्या अध्यक्षपदी मनोज छाजेड

    Leave a Reply
    Read next

    अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा; आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

    पुणे | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान…

    लायंस क्लब ऑफ पूना गणेशखिंड के नए पदाधिकारियों का भव्य पदस्थापना समारोह संपन्न

    पुणे | रैडिसन होटल, गोवा में लायंस क्लब ऑफ पूना गणेशखिंड के लायन वर्ष 2026–27 के नव-निर्वाचित पदाधिकारियों एवं…