लाज वाटली पाहिजे, माफी मागा… टिपू सुलतानवरून फडणवीस सपकाळांवर संतापले!

मुंबई | मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान – ए – हिंद निहाल अहमद यांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावला. त्यावरून सध्या राज्यात वातावरण तापले आहे. टिपू सुलतानचा फोटो काढून टाका म्हणून अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी केलेली असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यासंदर्भात मोठं विधान केलं. आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका करत संताप व्यक्त केला.

मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यावरून उद्भवलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे.’ असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर, देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजपकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर, हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, टिपू सुलतान सारख्या व्यक्तीची तुलना ते छत्रपती महाराजांसोबत करत आहेत. हे अत्यंत निंदनीय काम आहे. छत्रपतींनी स्वराज्य उभारलं, मोगलांच्या जोखडांतून  सामान्य माणसाला मुक्त केलं. खऱ्या अर्थाने त्यांनी सामान्य रयतेचे राज्य स्थापन केलं. तर दुसरीकडे टिपू सुलतानने हजारो लाखो हिंदूंची हत्या केली. मात्र हर्षवर्धन सपकाळ दोघांची तुलना करून दोघांना सारखा सन्मान द्या, असे म्हणतात. यापेक्षा जास्त लांगुनचालन या जन्मात मी पाहिलेलं नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सपकाळ यांनी केलेले वक्तव्य आम्ही बिलकुल सहन करणार नाही. छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतानची तुलना केल्याबद्दल सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, काँग्रेस पक्षात थोडी जरी नैतिकता राहिली असेल, तर काँग्रेसने सुद्धा त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे. आणि आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ कोणत्या शाळेत इतिहास शिकले, याचं संशोधन केलं पाहिजे? हा जो नवा इतिहास ते लिहित आहेत, तो इतिहास महाराष्ट्र आणि भारत कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिला आहे. यावरून महाराष्ट्रात आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान मालेगावच्या उपमहापौरांनी सामाजिक तेढ वाढू नये म्हणून त्यांच्या दालनात लावलेला टिपू सुलतान यांचा फोटा काढून टाकला आहे.

Share this article
Shareable URL
Prev Post

How AI is Revolutionizing the Tech Industry

Next Post

मोदी सरकारचा स्टार्टअप साठी मोठा निर्णय; १० हजार कोटींचा निधी मंजूर 

Read next

‘दिव्यांग मित्र’ अभियानांतर्गत गरजू दिव्यांग महिलेला अमित ठाकरेंच्या हस्ते व्हीलचेअर

पुणे | ‘दिव्यांग मित्र’ अभियानांतर्गत गरजू दिव्यांग महिलेला मनसे नेते तथा मनविसेचे अध्यक्ष अमित…

अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा; आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

पुणे | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान…

सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार

पुणे | सूस-नांदे परिसरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम…