ढोल-ताश्याच्या गजरात विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा

लोकसेवा ई स्कूलचा सिद्धार्थ आठले जेईई मेन्स ध्ये राज्यात पहिला व देशात २५ वा
पुणे |
लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये ढोल-ताश्याच्या गजरात कौतुकाचा सोहळा रंगला होता. आपल्या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेलं यश सर्वांच्याच चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं अन् आपल्या मुलाचा होणारा हा कौतुक सोहळा आई-वडील प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहात होते. निमित्त होतं, राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेत १०० टक्के मिळवलेल्या सिद्धार्थ आठले याच्या कौतुक सोहळ्याचं.

जेईई मेन्स परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून लोकसेवा ई स्कूल सिद्धार्थ आठले देशात २५ वा तर, महाराष्ट्रात पहिला आला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल लोकसेवा ई-स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजतर्फे सिद्धार्थ आठले याचा आई-वडिलांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बाकलीवाल टुटोरिअल्सचे प्रफुल द्रविड, दिलीप पेंडसे आणि मोशन अॅकॅडमीचे शिक्षण विभागाचे संचालक विक्रम बलवंत उपस्थित होते.

पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात केक कापून सिद्धार्थचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कला शिक्षक अक्षय पोटे यांनी सिद्धार्थ चे रांगोळीत नेत्रदीपक चित्र साकारले होते. तर, कला शिक्षक शंकर साळुंके यांच्या मार्गदर्शनात दहावीच्या अर्जुन मेंगल याने सिद्धार्थ चे हुबेहुब चित्र रेखाटले. सिद्धार्थच्या शिस्तबद्ध परिश्रमाचे आणि त्याने मिळवलेल्या उत्तुंग यशाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, मार्गदर्शक डॉ. ए. एल. देशमुख, प्राचार्य शॉफीमोन पी.एच. आणि शिक्षण विभागाचे संचालक प्रा. नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शॉफीमोन पी.एच. यांनी केले, तर उपप्राचार्या दीपाली गजभिये यांनी आभार मानले. उपप्राचार्या दीपाली गजभिये, समन्वयिका जानकी आणि पूर्वी शुक्ला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Share this article
Shareable URL
Prev Post

लोकसेवा ई स्कूलची जेईई मेन्स मध्ये ऐतिहासिक कामगिरी; सिद्धार्थ आठल्येला 100 टक्के गुण

Next Post

राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या एका जागेसाठी विक्रम काकडेंसह चार जणांमध्ये रस्सीखेच

Read next

मार्केटयार्डातील गुळ-भूसार व्यापाऱ्यांचा २५ फेब्रुवारीचा लाक्षणिक बंद स्थगित

पुणे | मार्केटयार्डातील गुळ-भूसार विभागातील व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांकडे बाजार समितीचे…