नीरजा बिहानी प्रथम (99.4%), श्रेया मानकर द्वितीय (99.2%) तर, नीलाद्री भट्टाचार्य तृतीय (98.6%)
पुणे | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पाषाण येथील लोकसेवा ई-स्कूलचा दहावीचा शैक्षणिक वर्ष 2025–26 च्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल लागला आहे. निकालाची ही उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. प्रथम आलेल्या नीरजा बिहानी ला 99.4 टक्के, द्वितीय आलेल्या श्रेया मानकर ला 99.2 टक्के तर, नीलाद्री भट्टाचार्य ला 98.6 टक्के गुण मिळाले आहेत.
शाळेच्या 151 विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तब्बल 48 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तसेच, 45 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांहून अधिक तर, इतर विद्यार्थ्यांना 70 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये उत्कृष्ट कामगिरीची परंपरा लोकसेवा ई स्कूलने कायम राखली आहे. त्यासाठी संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वांचेच योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील, प्राचार्य शॉफीमोन पीएच यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
लोकसेवा ई-स्कूल भविष्यातही अशाच पद्धतीने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणातून उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी संस्था कटिबद्ध असणार आहे.







