गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून जीतो अॅपेक्सच्या उपक्रमाचे कौतुक
विश्व नवकार मंत्र दिवसानिमित्त भारतासह १०० देशात एकाचवेळी कार्यक्रमाचे आयोजन
नवी दिल्ली | जगात सध्या युद्ध सुरु आहे. एकमेकांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊन वर्चस्वाच्या कारणास्तव युद्ध सुरु असताना जीतो अॅपेक्सच्या वतीने विश्व नवकार मंत्र दिनानिमित्त नवकार मंत्राच्या सामुहिक पठणाचे आयोजन केले. जीतोतर्फे जगामध्ये शांतता निर्माण व्हावी, सुख, शांती व समृद्धी राहावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आणि यामध्ये भारतासह शंभर देशांतील नागरिक सहभागी झाले व सर्वांनी एकाचवेळी शांततेसाठी, समृद्धीसाठी नवकार मंत्राचे पठण केले. जीतोने नवकार मंत्र पठणाचा वैश्विक उपक्रम करून इतिहास निर्माण केला आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांनी जीतोचे कौतुक केले व नवकार मंत्राची ताकद सांगितली.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे जीतो अॅपेक्सच्या वतीने आज ९ एप्रिल रोजी विश्व नवकार मंत्र दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतासह शंभर देशात सुमारे २५ हजार ठिकाणी या कार्यक्रमाचे एकाचवेळी आयोजन करण्यात आले होते. तसेच, दिल्लीतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करतानाच ही सर्व ठिकाणं लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून एकमेकांना जोडली होती. जीतो अॅपेक्सचे चेअरमन पृथ्वीराज कोठारी व अध्यक्ष विजय भंडारी यांचे या कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनाबद्दल शाह यांनी अभिनंदन केले. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख उपस्थितीत पहिल्यांदा विश्व नवकार मंत्र दिवस साजरा करण्यात आला होता. जीतो अॅपेक्स तर्फे दरवर्षी 9 एप्रिल हा दिवस विश्व नवकार मंत्र दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात येत आहे.
नवकार मंत्राचे महत्व सांगताना गृहमंत्री अमित शाह यांनी नवकार मंत्राचा अर्थ सांगताना त्याची विविध गुणवैशिष्टेही सांगितली. याबरोबरच आपल्या जीवनात सुख, शांती व समृद्धता प्राप्त करण्यासाठी नवकार मंत्राचे पठण आवश्यक आहे. यातून नवीन ऊर्जा मिळते. आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण प्रार्थना करतो. यातून जगाप्रती आदरभाव वाढतो. असेही गृहमंत्री शाह म्हणाले.
गृहमंत्री शाह यांनी जीतोच्या उपक्रमांचे यावेळी कौतुक करतानाच युद्धाच्या काळात जग अस्थिर झालेले असताना विश्व नवकार मंत्र दिवसाचे आयोजन केल्याबद्दल जीतोचे विशेष कौतुक केले.
जीतो अॅपेक्सचे चेअरमन पृथ्वीराज कोठारी यांनी विश्व नवकार मंत्र दिवसाच्या आयोजना मागची जीतोची भूमिका यावेळी सांगितली. भारतासह जगभरात एकाचवेळी नवकार मंत्राचे पठण होण्याचे नियोजन जीतोतर्फे करण्यात आले. त्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला व सहकार्य केल्याचेही ते म्हणाले.
अडीच कोटींहून अधिक लोकांकडून नवकार मंत्राचा जप!
जीतो अॅपेक्सच्या वतीने आज विश्व नवकार मंत्र दिवसाचे औचित्य साधून भारतासह जगभरातील १०० हून अधिक देशात नवकार मंत्राचा एकाचवेळी जप करण्यात आला. जगभर युद्धाचे सावट असताना व अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले असताना विश्व शांतीसाठी नवकार मंत्राचा आज जप करण्यात आला. यामध्ये अडीच कोटींहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून ही जगभरातील सुमारे २५ हजारांहून अधिक ठिकाणे एकमेकांशी जोडली गेली होती. दिल्लीतील विज्ञान भवन मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे जगभर लाईव्ह स्ट्रिमिंग झाले. नवकार मंत्र हा शांततेचे आवाहन करण्यासाठी केला जातो. आणि जगभरातील सध्याची अराजकता संपावी, आणि प्रत्येकामध्ये आत्मशांती निर्माण व्हावी असे आवाहन आज करण्यात आले. आणि त्यासाठी अडीच कोटींहून अधिक नागरिकांनी एकाचवेळी आवाहन केले. हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते, असे जीतो अॅपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी यावेळी सांगितले.








