दि पूना मर्चंट्स चेंबरच्या पाठपुराव्याला यश; यूपीआयवरील एमडीआर शुल्काची अंमलबजावणी दिवाळीनंतर

निर्णयाचे स्वागत; मात्र शुल्क पूर्णपणे रद्द होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार : राजेंद्र बाठिया

पुणे | व्यापाऱ्यांच्या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने निवडक व्यापारी यूपीआय (UPI) व्यवहारांवर व्यापारी सवलत दर (Merchant Discount Rate – MDR) लागू करण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेण्याचे जाहीर केले आहे. दि पूना मर्चंट्स चेंबरने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले हे यश असल्याचे सांगत चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, यूपीआय व्यवहारांवरील एमडीआर शुल्क पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत चेंबरचा पाठपुरावा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये आणि व्यापारी व ग्राहक यांच्यातील व्यवहार सुरळीत सुरू राहावेत, यासाठी यूपीआय व्यवहारांवर एमडीआर शुल्क आकारू नये, अशी  चेंबरची भूमिका आहे. दिवाळीपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी पुढे ढकलल्याने व्यापाऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी शुल्क आकारणीचा निर्णय कायमस्वरूपी रद्द होणे आवश्यक आहे, असे बाठिया यांनी सांगितले.

ते म्हणाले, “दि पूना मर्चंट्स चेंबरने व्यापाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, केंद्र सरकारने एमडीआर शुल्काच्या अंमलबजावणीचा निर्णय दिवाळीनंतर घेण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, हा केवळ तात्पुरता दिलासा आहे. यूपीआय व्यवहारांवरील एमडीआर शुल्क पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत व्यापाऱ्यांच्या वतीने आमचा पाठपुरावा सुरूच राहील.”

व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे हे चेंबरचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या भावना आणि अडचणी लक्षात घेऊन यूपीआय व्यवहारांवरील एमडीआर शुल्क आकारणीचा निर्णय पूर्णपणे रद्द करावा. यासाठी पूना मर्चंट्स चेंबर केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत राहील, असे अध्यक्ष  बाठिया यांनी सांगितले.

Share this article
Shareable URL
Prev Post

नवरात्र उत्सवानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात श्री देवीसूक्तम मंत्राचे सामूहिक पठण

Leave a Reply
Read next

युद्धाच्या अस्थिर काळात जगात शांतता नांदावी म्हणून नवकार मंत्राचा जप

गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून जीतो अॅपेक्सच्या उपक्रमाचे कौतुक विश्व नवकार मंत्र दिवसानिमित्त भारतासह १०० देशात…

अवघ्या ६० तासांत तब्बल ६००+ फ्लॅट्सचे बुकिंग व ६०० कोटींहून अधिकची विक्री

कोलते पाटील डेव्हलपर्सची रिअल इस्टेटमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद व्यान अॅट द रिझर्व्ह प्रीमियम २ व ३ बेडरुम…

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जीतो अ‍ॅपेक्सकडून मलेशियात होणारी ‘पॅट्रॉन मेंबर्स कॉन्क्लेव्ह’ रद्द

पुणे | अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम रोखण्यासाठी पंतप्रधान…