अवघ्या ६० तासांत तब्बल ६००+ फ्लॅट्सचे बुकिंग व ६०० कोटींहून अधिकची विक्री

कोलते पाटील डेव्हलपर्सची रिअल इस्टेटमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद

व्यान अॅट द रिझर्व्ह प्रीमियम २ व ३ बेडरुम गृहप्रकल्पाचा चा शुभारंभ

पुणे | रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीचे सावट असताना पुण्यातील कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड ने फ्लॅट्स विक्रीमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथील व्यान अॅट द रिझर्व्ह या प्रकल्पाच्या शुभारंभावेळी अवघ्या ६० तासांत तब्बल ६०० कोटींहून अधिक किंमतीच्या फ्लॅट्सची विक्री केल्याचा दावा केला आहे. कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड हे रिअल इस्टेटमधील नावाललेले बिल्डर असून त्यांची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचेही सांगण्यात आले.

रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीची चर्चा असताना कोलते पाटील डेव्हलपर्सने व्यान अॅट द रिझर्व्ह’ प्रकल्पाच्या शुभारंभावेळी केलेल्या सर्वोत्तम विक्रीची सध्या चर्चा सुरु आहे. हा प्रकल्प २० एकर क्षेत्रात विस्तारला असून त्यातील पहिला टप्पा असलेल्या ‘व्यान अॅट द रिझर्व्ह’ हा प्रीमियम २ आणि ३ बेडरूम फ्लॅट्सचा प्रकल्प आहे. मोकळी जागा, मैदान, मनोरंजन, वेलनेस, विश्रांती आणि क्रीडा सुविधांनी युक्त असलेला हा गृहप्रकल्प आहे. यामध्ये प्रशस्त फ्लॅ्टस, एनडीएच्या टेकड्या, मुठा नदीकाठ व ऐतिहासिक सिंहगडाचे दृश्य या वैशिष्ट्यांमुळे हा प्रकल्प वेगळा ठरला आहे. त्याचे एकूण संभाव्य विक्री योग्य क्षेत्रफळ अंदाजे ५ दशलक्ष चौरस फूट आहे. या विकासाचे अपेक्षित ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू (जीडीव्ही) सुमारे ४,००० कोटी रुपये आहे.

या प्रकल्पाच्या शुभारंभानंतर अवघ्या ६० तासांत तब्बल ६०० हून अधिक फ्लॅट्सचे बुकिंग झाले आणि ६०० कोटींहून अधिक किंमतीची विक्री झाली. ही कोलते-पाटील डेव्हलपर्सच्या इतिहासातील गृहप्रकल्पाच्या शुभारंभाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पुण्यात गेल्या ३५ वर्षांपासून कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड काम करीत आहे. बदलत्या शहरातील नागरिकांची घराची गरज, कोलते पाटील डेव्हलपर्सची बाजारपेठेची समज, विकासातील कौशल्य आणि अंमलबजावणीची क्षमता या कामगिरीतून दिसून येते.

याविषयी कोलते-पाटील डेव्हलपर्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी प्रणव मेहता म्हणाले की, “घर खरेदी करणारे ग्राहक दर्जा, जागा आणि एकूणच राहणीमानाच्या अनुभवाला अधिक महत्त्व देत आहेत. ‘द रिझर्व्ह’मध्ये आम्ही या सर्व बाबी एकत्र आणून एक वेगळा निवासी प्रकल्प साकारला आहे. ‘व्यान’ला मिळालेल्या प्रतिसादामुळे हा पुण्यातील आमचा सर्वात मोठा लॉन्च ठरला आहे. यामुळे कोलते-पाटील ब्रँडची ताकद आणि आम्ही अनेक दशकांपासून विकसित केलेल्या पुण्याच्या बाजारपेठेची आमची सखोल समज अधोरेखित होते. आमचा भर मजबूत अंमलबजावणी आणि आमच्या प्रकल्पांमध्ये सातत्यपूर्ण डिलिव्हरीवर राहील, ज्याला आमच्या कामाची गुणवत्ता आणि शिस्त यांचा आधार आहे.”

दक्षिण-पश्चिम पुण्यातील सिंहगड रोड वरील मुठा नदीकाठचा वडगाव मधील परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरात शाळा, आरोग्यसेवा, किरकोळ विक्री केंद्रे आणि दैनंदिन गरजांच्या इतर सुविधांमुळे हा भाग एक प्रस्थापित निवासी परिसर म्हणून विकसित झाला आहे. पुण्याच्या वाहतूक आणि रस्ते नेटवर्कमध्ये प्रस्तावित सुविधांमुळे या भागाची शहरातील इतर परिसरांशी कनेक्टिव्हिटी आणखी सुधारण्याची अपेक्षा आहे.

कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडविषयी

कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (बीएसई: ५३२९२४, एनएसई: केओएलटीईपीएटीआयएल; केपीडीएल) ही १९९१ मध्ये स्थापन झालेली भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक कंपनी आहे. मुंबई, पुणे आणि बंगळुरूमध्ये कंपनीची उपस्थिती आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीने जागतिक गुंतवणूक संस्था ब्लॅकस्टोनसोबत धोरणात्मक भागीदारी केली. दोन टप्प्यांमध्ये झालेल्या व्यवहारांतर्गत विद्यमान प्रवर्तकांकडून प्रेफरेंशियल इक्विटी शेअर्सचे वाटप आणि सेकंडरी इक्विटी शेअर्सच्या अधिग्रहणानंतर ब्लॅकस्टोनने कंपनीमध्ये ४०% हिस्सा संपादित केला आहे.

कोलते-पाटील हे उच्च दर्जाचे मानक, वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, पारदर्शकता आणि प्रकल्पांची वेळेवर पूर्तता यासाठी ओळखले जाणारे विश्वसनीय नाव आहे. कंपनीने पुणे, मुंबई आणि बंगळुरूमध्ये निवासी संकुले, इंटिग्रेटेड टाउनशिप्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि आयटी पार्क्ससह ६८ हून अधिक प्रकल्प विकसित आणि बांधले असून, त्यांचे एकूण विक्रीयोग्य क्षेत्रफळ ३३ दशलक्ष चौ. फुटांपेक्षा अधिक आहे. कंपनीच्या अनेक प्रकल्पांना इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) कडून प्रमाणित करण्यात आले आहे.

Share this article
Shareable URL
Prev Post

मार्केट यार्ड गूळ-भुसार विभागातील ‘नो यूपीआय’ आंदोलन

Next Post

जीतो पुणेच्या अध्यक्षपदी मनोज छाजेड

Read next

रविवारपासून माँ आशापुरा माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

अभिषेक, नवचण्डी महायज्ञ, भजन जैमिंगसह माता की चौकी व पुणे गॉट टॅलेंट कार्यक्रमांचे आयोजन पुणे । गंगाधाम चौक येथे…