जीतो पुणेच्या अध्यक्षपदी मनोज छाजेड

मुख्य सचिवपदी जिनेंद्र लोढा, वुमन विंग अध्यक्षपदी लतिका सांकला, तर युथ विंग अध्यक्षपदी ऋषभ दुगड

पुणे | व्यापार व उद्योग क्षेत्रातील प्रमुख संस्था म्हणून ओळख असलेल्या ‘जीतो पुणे’च्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत जीतो पुणेच्या अध्यक्षपदी मनोज छाजेड, तर मुख्य सचिवपदी जिनेंद्र लोढा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून सर्व नवीन पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.

या नवनियुक्त निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जीतो पुणे वुमन विंगच्या अध्यक्षपदी लतिका सांकला व मुख्य सचिवपदी वंदना राठोड यांची निवड करण्यात आली. जीतो पुणे युथ विंगच्या अध्यक्षपदी ऋषभ दुगड, तर मुख्य सचिवपदी स्वराज पगारिया यांची निवड झाली. महावीर प्रतिष्ठान येथे झालेल्या जीतो पुणेच्या सर्वसाधारण सभेत मुख्य संस्था, महिला आणि युवा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या या सर्व निवडी सर्वानुमते आणि बिनविरोध करण्यात आल्या.

या सर्वसाधारण सभेला जीतो अपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांच्यासह विजयकांत कोठारी, इंदर जैन, रवी सांकला, चेतन भंडारी, अजय मेहता, प्रियंका परमार, इंद्रकुमार छाजेड, दिनेश ओसवाल तसेच संस्थेचे विविध पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. व्यापार, उद्योग आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सदस्यांना एकत्र आणून व्यवसायिक नेटवर्किंग, सामाजिक उपक्रम आणि संघटनात्मक बांधणीसाठी जीतो पुणे सातत्याने कार्यरत आहे.

‘‘संस्थेच्या विविध उपक्रमांचे प्रभावी नियोजन करून व्यापारी व उद्योजकांना अधिक व्यापक स्वरूपात एकत्र आणणे आणि संघटनात्मक कार्याची व्याप्ती वाढविण्यावर आमचा भर राहील. त्याचबरोबर संस्थेचे कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन प्रकल्प मार्गी लावण्यासाठीही नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील.’’

– मनोज छाजेड, नवनिर्वाचित अध्यक्ष, जीतो पुणे

Share this article
Shareable URL
Prev Post

अवघ्या ६० तासांत तब्बल ६००+ फ्लॅट्सचे बुकिंग व ६०० कोटींहून अधिकची विक्री

Leave a Reply
Read next

मोदी सरकारचा स्टार्टअप साठी मोठा निर्णय; १० हजार कोटींचा निधी मंजूर 

दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्टार्टअप साठी मोठा निर्णय घेतला.…

मार्केटयार्डातील गुळ-भूसार व्यापाऱ्यांचा २५ फेब्रुवारीचा लाक्षणिक बंद स्थगित

पुणे | मार्केटयार्डातील गुळ-भूसार विभागातील व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांकडे बाजार समितीचे…