नवरात्र उत्सवानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात श्री देवीसूक्तम मंत्राचे सामूहिक पठण

पुणे | नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर गंगाधाम चौकातील प्रसिद्ध माँ आशापुरा माता मंदिरात शेकडो भक्तांच्या उपस्थितीत ‘श्री देवीसूक्तम’ मंत्राचे सामूहिक पठण अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. नवरात्रीच्या विशेष उत्सवानिमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये या सामूहिक पठणाने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

माँ आशापुरा माता मंदिरामध्ये शेकडो भाविक आणि पुरोहितांनी एकत्र येत शुचिर्भूत होऊन देवीसूक्ताच्या पवित्र मंत्रांचा गजर केला. शंख नाद करीत मंत्र पठणास सुरुवात झाली. मंत्रोच्चारांच्या दैवी लहरींमुळे संपूर्ण मंदिर परिसर आणि परिसर दुमदुमून गेला होता. सामूहिक पठणामुळे निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आणि भक्तिभावाने उपस्थित असलेल्या प्रत्येक भाविकाला मंत्रमुग्ध केले.

मंदिराचे मुख्य पुजारी आणि विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. भारती भंडारी, लीना भंडारी, रूपाली चोरडिया, अचला भंडारी, रेखा खंडेलवाल, शिल्पा कटारिया, सुजाता गोयल, टीना अगरवाल आणि श्री देवीसूक्तम कमिटीच्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

नवरात्र उत्सव सुरु झाल्यापासून माँ आशापुरा मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक गर्दी करत आहेत. या काळात देवीसूक्ताचे पठण केल्याने सुख, समृद्धी आणि मानसिक शांती लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर व्यवस्थापन समिती आणि स्थानिक स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती.

याठिकाणी होत असलेला नवरात्र उत्सवदेखील खूप वेगळ्या स्वरुपाचा आणि समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी दर्शनासाठी येतात.

नवरात्र उत्सवातील कार्यक्रम
बुधवार, १४ ऑक्टोबर – पुणे गॉट टॅलेंट – सायं. ७.३०
गुरुवार, १५ ऑक्टोबर – श्री सुक्त पठण – स. ८.३०
शुक्रवार, १६ ऑक्टोबर – देवी सहस्त्रावर्तन – स.७
शुक्रवार, १६ ऑक्टोबर – नवदुर्गा सन्मान सोहळा – सायं. ७.३०
शनिवार, १७ ऑक्टोबर – भजन जैमिंग (दिशांत पारख ग्रुप) – सायं. ७.३०
रविवार, १८ ऑक्टोबर – भजन संध्या (गुरूकृपा व्हायोलिन ब्रेथलेस ग्रुप) – सायं. ७.३०
सोमवार, १९ ऑक्टोबर – कन्यापूजन – स. १०

Share this article
Shareable URL
Prev Post

प्रीमियम घर : पुण्यातील रिअल इस्टेटला आकार देणारे घटक

Next Post

दि पूना मर्चंट्स चेंबरच्या पाठपुराव्याला यश; यूपीआयवरील एमडीआर शुल्काची अंमलबजावणी दिवाळीनंतर

Leave a Reply
Read next

‘युझर चार्जेस’मुळे महागाईचा भडका; सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा – दि पूना मर्चंटस चेंबर

पुणे | पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार विभागातील अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि आनुषंगिक वस्तूंवरील…

लायंस क्लब ऑफ पूना गणेशखिंड के नए पदाधिकारियों का भव्य पदस्थापना समारोह संपन्न

पुणे | रैडिसन होटल, गोवा में लायंस क्लब ऑफ पूना गणेशखिंड के लायन वर्ष 2026–27 के नव-निर्वाचित पदाधिकारियों एवं…