माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘श्री सूक्त पठणाचे’ आयोजन

महावीर इंग्लिश मीडियम स्कूल व रसिकलाल माणिकचंद धारिवाल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पठण

पुणे : माँ आशापुरा माता मंदिर येथे सुरु असलेल्या नवरात्र उत्सवात आज सामुहिकपणे श्री सूक्त पठणाचे आयोजन करण्यात आले होते. महावीर इंग्लिश मीडियम स्कूल आणि रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हे श्री सूक्त पठण करण्यात आले. श्री सूक्त पठणाच्या या धार्मिक कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्राचीन वेदपीठाची ओळख करून देणे आणि त्यामधील अध्यात्मिक संदेश मनात रुजविणे हा होता.

कार्यक्रमाची देवीच्या आराधनेने झाली. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि उत्तम मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने या सामूहिक पठणाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि शुद्ध उच्चारांमध्ये ‘श्री सूक्त’ पठण केले. यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि सकारात्मक ऊर्जेने न्हाऊन निघाला.

या प्रसंगी माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विजय भंडारी, चेतन भंडारी, विजयकांत कोठारी, आदेश खिवंसरा, श्याम खंडेलवाल, राजेंद्र गोयल, विजय भटेवरा, नितीन ओस्तवाल व अन्य पदाधिकारी, दोन्ही विद्यालयांचे शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले. शाळेच्या प्रशासनाने आणि पालकांनी ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले व आभार मानले.

“श्री सूक्त पठणासारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते आणि त्यांच्यात मानसिक शांतता निर्माण होते. त्यामुळे दरवर्षी नवरात्र उत्सवात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्री सूक्त पठणाचा उपक्रम आयोजित केला जातो. निरागस व शुद्ध भाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे त्यांनाही नवरात्र उत्सवात मातेचा आशिर्वाद मिळाल्याचा आनंद आहे.”

  • विजय भंडारी (अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट)
Share this article
Shareable URL
Prev Post

माँ आशापुरा मंदिरात नवरात्रनिमित्त पुणे गॉट टॅलेंट स्पर्धेचे दिमाखात आयोजन

Leave a Reply
Read next

राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या एका जागेसाठी विक्रम काकडेंसह चार जणांमध्ये रस्सीखेच

विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा पुणे | विधान परिषदेच्या नऊ…

नवरात्र उत्सवानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात श्री देवीसूक्तम मंत्राचे सामूहिक पठण

पुणे | नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर गंगाधाम चौकातील प्रसिद्ध माँ आशापुरा माता मंदिरात शेकडो भक्तांच्या…

मार्केटयार्डातील गुळ-भूसार व्यापाऱ्यांचा २५ फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संप

पुणे | मार्केटयार्डातील गुळ-भूसार विभागातील व्यापाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांकडे बाजार…

दि पूना मर्चंट्स चेंबरच्या पाठपुराव्याला यश; यूपीआयवरील एमडीआर शुल्काची अंमलबजावणी दिवाळीनंतर

निर्णयाचे स्वागत; मात्र शुल्क पूर्णपणे रद्द होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार : राजेंद्र बाठिया पुणे |…