भारती विजय भंडारी यांना ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान

पुणे | श्री चामुंडा भवानी माता मंदिर यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारती विजय भंडारी यांना अत्यंत मानाच्या ‘नवदुर्गा पुरस्काराने’ गौरविण्यात आले. नवरात्र उत्सवाच्या पवित्र आणि उत्साही वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते भारती भंडारी यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल असे होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. समाजात माता आणि भगिनींचे स्थान सर्वोच्च असून, कर्तृत्ववान महिलांचा गौरव करणे हा समाजाचा सन्मान करण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या कर्तृत्वाला दाद देण्याचा मंदिराचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या सोहळ्याप्रसंगी श्री चामुंडा भवानी माता मंदिराचे विश्वस्त राजेश नहार उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भारती विजय भंडारी यांनी श्री चामुंडा भवानी माता मंदिर देवस्थान आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. हा पुरस्कार माझ्या जबाबदारीची जाणीव आणखी वाढवणारा आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this article
Shareable URL
Prev Post

माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘श्री सूक्त पठणाचे’ आयोजन

Leave a Reply
Read next

राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या एका जागेसाठी विक्रम काकडेंसह चार जणांमध्ये रस्सीखेच

विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा पुणे | विधान परिषदेच्या नऊ…

मार्केटयार्डातील गुळ-भूसार व्यापाऱ्यांचा २५ फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संप

पुणे | मार्केटयार्डातील गुळ-भूसार विभागातील व्यापाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांकडे बाजार…