पुणे । आपल्या जगण्यात सामाजिक दायित्व असणे आवश्यक आहे. हेच सामाजिक दायित्व ठेवून जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष व लायन्स क्लब ऑफ पुणेचे माजी प्रांतपाल विजय भंडारी यांचा ५९ वा वाढदिवस आज साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहात भंडारी यांना शुभेच्छा दिल्या.
जीतो, लायन्स क्लब, युगल धर्म संघ, आशापुरा माता मंदिर ट्रस्ट आदी संस्थांच्या माध्यमातून विजय भंडारी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी या विविध संस्थांचे मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जीतो अॅपेक्सचे माजी चेअरमन गणपत चौधरी, हिमांशु शाह, जीतो अॅपेक्सची कार्यकारिणी, विजयकांत कोठारी, अॅड. एस. के. जैन, राजेश सांकला, इंदर जैन, रवी सांकला, कृष्णकुमार गोयल, राजेश शहा, राजेंद्र बाठिया, इंदर छाजेड, मनोज छाजेड, पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, चेतन भंडारी, डॉ. प्रदीप बाफना, राहुल सांकला, श्याम खंडेलवाल, मंगेश कटारिया, जिनेंद्र लोढा, गोपालकृष्ण अग्रवाल, विकास अग्रवाल, सचिन जैन, राजेंद्र गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. यानिमित्त द्वारका जालान व संदीप पंचवाटकर यांचा जीना इसी का नाम है हा संगीतमय कार्यक्रम झाला.
विजय भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या वतीने रास्ता पेठेतील समर्थ हॉस्पिटल येथे सीटी स्कॅन मशीन भेट देण्यात आली. याबरोबरच आशापुरा माता मंदिर ट्रस्ट व लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने १०० विद्यार्थ्यांना २१ लाख रुपयांची स्कॉलरशीप, आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजूंना १० शिवणयंत्र मशीन, किरकोळ विक्रेत्यांना छत्री, ३०० हेल्मेटचे वितरण, ई-वेस्ट कलेक्शन केंद्र, ५०० झाडांचे वृक्षारोपण, वर्षभरात दहा आरोग्य शिबिरे, मुकबधिर विद्यालयाला मदत, शाळांमध्ये नर्सरीसाठी ग्रंथालय अशा प्रकारच्या पुढील वर्षभरात करण्यात येणाऱ्या सामाजिक कामांची आज घोषणा करण्यात आली.
सामाजिक कार्यात योगदान देता आले याचा आनंद
उद्योग-व्यापारातून योग्य मार्गाने पैसा कमावून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे हे आपले पहिले कर्तव्य असते. कुटुंबाप्रती कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर आपण समाजासाठी काम करणे अपेक्षित आहे. आईच्या सांगण्यावरून मी सामाजिक क्षेत्रात आलो. पत्नी भारती व बंधु चेतन आणि संपूर्ण कुटुंबाने साथ दिल्यामुळे जमेल तेवढे सामाजिक काम केले. यासाठी ईश्वराचा आशीर्वाद लाभला. यापुढेही समाजाची सेवा करण्याला प्राधान्य राहील, अशी भावना वाढदिवसानिमित्त विजय भंडारी यांनी व्यक्त केली.








