जीतो पुणे चॅप्टरचा दिवाळी मीट कार्यक्रम दिमाखात संपन्न!

विजय भंडारींच्या जीतो अॅपेक्स अध्यक्षच्या गोल्डन इरा कार्यकालाप्रती कृतज्ञता व्यक्त

पुणे : जीतो पुणे चॅप्टरच्या नुतन कार्यकारिणीचा पहिलाच दिवाळी मीट कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी उपस्थित महिलांसाठी व कुटुंबियांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांच्या गोल्डन इरा कार्यकालाबद्दल जीतो पुणेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जीतो पुणे चॅप्टरच्या नवीन कार्यकारिणीचा दिवाळी मीट हा पहिलाच कार्यक्रम होता आणि त्याला मोठी उपस्थिती लाभली होती.

जीतो पुणेचे अध्यक्ष मनोज छाजेड, मुख्य सचिव जिनेंद्र लोढा, खजिनदार मंगेश कटारिया, जीतो पुणे वुमन विंगच्या अध्यक्षा लतीका सांकला, मुख्य सचिव वंदना राठोड, जीतो पुणे युथ विंगचे अध्यक्ष ऋषभ दुगड, मुख्य सचिव स्वरा पगारिया, सल्लागार समितीचे सदस्य अचल जैन, राजेश सांकला, रविंद्र सांकला, चेतन भंडारी, अजय मेहता, इंदर छाजेड, दिनेश ओसवाल, प्रवीण चोरबेले, अभय दर्डा, निलेश ओसवाल, ललित शिंगवी, मुकेश छाजेड, करण जैन, महेंद्र सुंदेचा, रवी दुगड, पवन भंडारी, कुणाल ओस्तवाल, अमित लोढा, अमोल कुचेरिया, पराग दोशी, राहुल संचेती, संदेश खिंवसरा, अमित ललवाणी, संतोष जैन आदी जीतो पुणेचे पदाधिकारी आणि विलास राठोड, पोपटलाल ओस्तवाल, सुभाष ललवाणी, अनिल नहार, माणिक दुगड, लक्ष्मीकांत खाबिया, दिलीप जैन, अनिल भन्साळी, राजकुमार लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवाळी मीटच्या कार्यक्रमास दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. त्यानंतर श्रीगणेश वंदना व नवकार महामंत्राचे पठन झाले. जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांचा २०२४ ते २०२६ हा गोल्डन इरा कार्यकाल नुकताच पूर्ण झाला. त्यांच्या या कार्यकालाबद्दल जीतो पुणेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी विजय भंडारी यांच्यासह जेएटीएफचे राष्ट्रीय अध्यक्ष इंदर जैन, जीतो अॅपेक्सचे संचालक राजेश सांकला, सुजीत भटेवरा, प्रियांका परमार, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र जैन व रविंद्र सांकला यांच्या कार्याबद्दलही यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी महिलांसाठी, कुटुंबियांसाठी विशेष मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. यामधील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. दिवाळी मीटच्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यामुळे बिझनेस नेटवर्कींग खूप चांगल्या प्रकारे झाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

दिवाळी मीटच्या यशस्वी आयोजनासाठी जीतो पुणेचे उपाध्यक्ष सुदर्शन बाफना, वास्तुपाल रांका, मनोज बोकाडिया, सचिव आदेश खिंवसरा, सहसचिव अभिजीत डुंगरवाल, सहखजिनदार प्रकाश ओसवाल, जीतो पुणे वुमन विंगच्या सचिव अर्चना कोचर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

जीतो पुणे चॅप्टरमध्ये केलेल्या कामामुळेच जीतो अॅपेक्समध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. संधी सर्वांना मिळते परंतु, मिळालेल्या त्या संधीचे सोने करण्यासाठी आपल्या मनात इच्छा पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि आपल्या सहकाऱ्यांना कामासाठी वाव देता आला पाहिजे. सर्वांचे सहकार्य लाभल्यानेच मलादेखील चांगले काम करता आले.

विजय भंडारी (सल्लागार, जीतो अॅपेक्स कौन्सिल)

जीतो पुणे चॅप्टरच्या नवीन कार्यकारिणीचा दिवाळी मीट हा पहिलाच कार्यक्रम भव्य झाला. मोठ्या संख्येने मान्यवर सहभागी झाल्याने त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे बिझनेस नेटवर्कींग झाले. यापुढच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात अशाच प्रकारच्या उत्तमोत्तम कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल आणि जीतो पुणे च्या दैदिप्यमान परंपरेत आणखी भर घालण्याचे काम आम्ही करू.
मनोज छाजेड (अध्यक्ष, जीतो पुणे)

नवीन कार्यकारिणीमध्ये सर्वच पदाधिकारी दमदार आहेत. प्रत्येकजण सर्वोत्तम काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. येणाऱ्या कार्यकाळात सर्वांच्या साथीने नवीन कार्यकारिणी अध्यक्ष मनोज छाजेड यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करेल.
जिनेंद्र लोढा (मुख्य सचिव, जीतो पुणे)

जीतो पुणे च्या वुमन विंगच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काम केले जाईल. उद्योग व व्यापारामध्ये महिलांची संख्या वाढण्यासाठी आणि त्यांचे नेटवर्क उभा करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.
लतीका सांकला (अध्यक्ष, जीतो पुणे वुमन विंग)

Share this article
Shareable URL
Prev Post

४५० दृष्टीबाधितांना दिवाळी शिधा वाटप

Leave a Reply
Read next

सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार

पुणे | सूस-नांदे परिसरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम…

लोकसेवा ई स्कूलची जेईई मेन्स मध्ये ऐतिहासिक कामगिरी; सिद्धार्थ आठल्येला 100 टक्के गुण

अतेन पांचभुडे द्वितीय (99.98), तर हर्षित शाह तृतीय (99.83)पुणे | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पाषाण येथील लोकसेवा…