जीतोतर्फे देशातील सर्वात मोठा विवाह परिचय सोहळ्याचे आयोजन

येत्या ६ व ७ जून रोजी पुण्यातील हॉटेल वेस्टीन मध्ये होणार मेळावा

पुणे | जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) तर्फे येत्या ६ व ७ जून रोजी पुण्यातील हॉटेल वेस्टीन येथे देशातील सर्वात मोठ्या जैन समाजाच्या विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय विवाह परिचय मेळाव्यासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही विवाह इच्छुक वधु-वरांनी सहभाग नोंदविला आहे.

देशभरातील जैन समाजातील २४ ते ३२ वयोगटातील युवक-युवतींकडून या विवाह परिचय मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. देश-विदेशातून तब्बल ३५० उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे. या विवाह परिचय मेळाव्यास जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय चेअरमन पृथ्वीराज कोठारी, राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, सेक्रेटरी जनरल ललित डांगी, अॅपेक्स डायरेक्टर राजेश सांकला व सुजित भटेवरा, जेएटीएफ रोम चे चेअरमन रविंद्र सांकला व अॅपेक्स इव्हेंट मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन जिनेंद्र लोढा यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ विवाह इच्छुक वधु-वरांचा परिचय कार्यक्रम नाही तर, जीतो मॅट्रिमोनी टीमकडून प्रत्येक उमेदवाराला वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन केले जाणार आहे. योग्य जोडीदार निवडण्यासाठी अनुभवी व्यक्तींकडून प्रत्यक्ष संवाद साधून सहाय्य केले जाणार आहे. जीतो मॅट्रिमोनी अॅपेक्स ने आजपर्यंत देशभरात अनेक यशस्वी विवाह जुळवून दिल्यामुळे या उपक्रमाकडे समाजातून मोठा विश्वासाने पाहिले जात आहे. सध्याच्या काळात विवाह जुळविणे अवघड होत असताना जीतो मॅट्रिमोनी एक प्रभावी माध्यम ठरत आहे.

या विवाह परिचय मेळाव्यात विवाह क्षेत्रात निस्वार्थ भावनेने आयुष्यभर कार्य करणाऱ्या तीन मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये मुंबईचे नवीन नाहर, पुण्याचे पृथ्वीराज धोका आणि सुभाष ललवानी यांचा समावेश आहे.

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी मॅट्रिमोनी टीमच्या डायरेक्टर इन्चार्ज प्रियंकाजी परमार, नीरू मेहता, महाराष्ट्र चेअरमन राजेंद्र जैन तसेच पुणे जीतो चॅप्टरचे चेअरमन इंदर छाजेड यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

आयुष्याचा योग्य जोडीदार निवडण्यासाठी जीतो मॅट्रिमोनी विश्वासार्ह माध्यम

गेल्या २० ते २५ वर्षांत आपण वेगाने प्रगती साधत आहोत. जसजशी प्रगती साधतोय तसतसा संवादही कमी होत चाललाय. अशा परिस्थितीमध्ये विवाहयोग्य इच्छुक वधु-वरांना योग्य साथीदार निवडण्यात कुटुंबांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यात जैन समाज व्यवसाय व उद्योगाच्या निमित्ताने देशभर आणि जगभर विस्तारलेला आहे. त्यामुळे योग्य जीवन साथीदार निवडण्याचे काम अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. या परिस्थितीत जीतो मॅट्रिमोनी सारख्या माध्यमातून अतिशय उत्तम काम या क्षेत्रात सुरु आहे. या कामातूनच जीतो मॅट्रिमोनीबद्दल विश्वास वाढला आहे. येत्या ६ व ७ जून रोजी पुण्यात होणाऱ्या विवाह परिचय मेळाव्याला देशभरातून आणि परदेशातील उमेदवारांनी नोंदणी केली आहे. जीतोच्या कार्यापैकी एक असलेल्या या विवाह परिचय मेळाव्याने जीतोला आणखी मजबूतीने समाजाशी जोडले जात आहे.

– विजय भंडारी (राष्ट्रीय अध्यक्ष, जीतो अॅपेक्स)

      Share this article
      Shareable URL
      Prev Post

      पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जीतो अ‍ॅपेक्सकडून मलेशियात होणारी ‘पॅट्रॉन मेंबर्स कॉन्क्लेव्ह’ रद्द

      Next Post

      ‘युझर चार्जेस’मुळे महागाईचा भडका; सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा – दि पूना मर्चंटस चेंबर

      Read next

      लायंस क्लब ऑफ पूना गणेशखिंड के नए पदाधिकारियों का भव्य पदस्थापना समारोह संपन्न

      पुणे | रैडिसन होटल, गोवा में लायंस क्लब ऑफ पूना गणेशखिंड के लायन वर्ष 2026–27 के नव-निर्वाचित पदाधिकारियों एवं…

      रविवारपासून माँ आशापुरा माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

      अभिषेक, नवचण्डी महायज्ञ, भजन जैमिंगसह माता की चौकी व पुणे गॉट टॅलेंट कार्यक्रमांचे आयोजन पुणे । गंगाधाम चौक येथे…