अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

मुंबई | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात घातपात होता की, अपघात होता यावर संशय व्यक्त केला जात असतानाच आज आमदार रोहित पवार यांनी पुन्हा याविषयी थेट आरोप केले आहेत. अजित पवार ज्या विमान अपघातात गेले ते विमान व्हिएसआर कंपनीचे होते. आणि या कंपनीच्या मालकाशी सरकारमधील काही नेत्यांचे संबंध आहेत. त्यामुळे या विमान कंपनीला वाचवण्याचे प्रयत्न तर, सुरु नाहीत ना? असा संशय तपासाला लागत असलेल्या उशिरामुळे निर्माण होत आहे.

व्हिएसआर कंपनीवर कारवाई का केली जात नाही? असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवार सत्तेत होते व ते राज्यातील मोठे नेते होते. मात्र, तरीही राज्यातील सत्ताधारी शांत का आहेत? सत्तेचा वापर करून चौकशी करा आणि प्राथमिक रिपोर्ट द्या. आम्ही सत्तेत नसताना पुरावे देतोय. त्यामुळे सत्तेत असलेल्यांना काय अडचण आहे? असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. व्हिएसआर कंपनीला वाचवले जात असल्याचे सांगून रोहित पवारांनी दोन दिवसात रिपोर्ट आला पाहिजे, असेही म्हटले आहे.

आज १८ फेब्रुवारी आहे. रोहित सिंग नावाचा व्हिके सिंगचा मुलगा आहे. या रोहित सिंगचे लग्न दीड दोन वर्षापूर्व राजस्थानमधील मॅरिएटला झाले होते. त्या लग्नाला कोण कोण उपस्थित होते? तिथे घातपाताचा संशय असलेले गेलेले होते. हे माझे म्हणणे नाही असे म्हणत महाराष्ट्रातील माजी मंत्री, आंध्रप्रदेशच्या टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते तिकडे गेले होते अशी माहिती रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली.

व्हिएसआरवर कारवाई करायची म्हटले की, तेव्हा टीडीपीचे नेते म्हणतात, त्यांची चूक नाही. घात किंवा अपघात झाल्यापासून आतापर्यंत राज्याचे मंत्री व्हिएसआरने प्रवास करत आहे. का इतर राज्याचे मंत्रीही प्रवास करत आहेत. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत. हैद्राबादचा बडा नेताही व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत. व्हिएसआर कंपनीवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशा स्पष्ट शब्दात रोहित पवारांनी निशाणा साधलाय. कोणी ब्लॅकमेल करून पायलटला हे करायला सांगितले का? हा आमचा संशय आहे. कारण पायलटला कौटुंबिक अडचणी होत्या, कितीतरी वर्ष त्याच्याकडे नोकरी नव्हती. व्हिएसआर कंपनीने त्याला अत्यंत कमी पगारात नोकरीला ठेवले होते. असे मुद्देही रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले. 

Share this article
Shareable URL
Prev Post

टी२० विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया आऊट, २००९ नंतर पहिल्यांदाच साखळी फेरीत बाद

Next Post

उन्हाळ्यात सनस्क्रीन लावणं खरंच आवश्यक आहे का?

Read next

सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार

पुणे | सूस-नांदे परिसरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम…

‘दिव्यांग मित्र’ अभियानांतर्गत गरजू दिव्यांग महिलेला अमित ठाकरेंच्या हस्ते व्हीलचेअर

पुणे | ‘दिव्यांग मित्र’ अभियानांतर्गत गरजू दिव्यांग महिलेला मनसे नेते तथा मनविसेचे अध्यक्ष अमित…

अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा; आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

पुणे | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान…