लोकसेवा ई स्कूलची जेईई मेन्स मध्ये ऐतिहासिक कामगिरी; सिद्धार्थ आठल्येला 100 टक्के गुण

अतेन पांचभुडे द्वितीय (99.98), तर हर्षित शाह तृतीय (99.83)
पुणे | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पाषाण येथील लोकसेवा ई-स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी २०२६ च्या जेईई मेन्स परीक्षेत इतिहास घडवला आहे. शाळेचा विद्यार्थी सिद्धार्थ आठल्ये यास जेईई मेन्स परीक्षेत १०० टक्के गुण मिळाले असून महाराष्ट्रातून केवळ दोनच विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्यात लोकसेवा ई स्कूलचा विद्यार्थी सिद्धार्थ आठल्ये याचा समावेश आहे. देशपातळीवर सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. सिद्धार्थ आठल्येचा देशपातळीवर २५ वा क्रमांक आला आहे.

याबरोबरच लोकसेवा ई स्कूलच्या अतन पांचभुडे यांनी 99.98 गुण मिळवत द्वितीय स्थान मिळवले, तर हर्षित शाह याने 99.83 गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. याबरोबरच आशुतोष जयेश कलभांडे (99.76), श्लोक शेळके (99.74), अनुष्का घोरपडे (99.09), चार्वी मराठे (98.96), मल्हार जगताप (98.8), शार्दुल गोडबोले (98.65), राजोर्षी चट्टोपाध्याय (97.23), रौनक फुलफगार (95.32), अनिश जामखंडे (95.32) आणि अर्जुन जोशी (93.54) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

लोकसेवा ई स्कूलच्या जेईई मेन्स परीक्षेतील या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील, प्राचार्य शॉफीमोन पीएच, उपप्राचार्य दीपाली गजभिये यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स (Session 2) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरेला नवी उंची दिली आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची अथक मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, नियोजन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

लोकसेवा ई-स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखली असून, भविष्यातही अशाच यशाची परंपरा सुरू ठेवण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतली जाणारी ही परीक्षा देशातील सर्वात स्पर्धात्मक अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा असून यामध्ये देशभरातून सुमारे 15 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. अशा प्रचंड स्पर्धेतून सिद्धार्थने मिळवलेले हे यश अत्यंत उल्लेखनीय आहे.

यंदा देशभरातून केवळ मोजक्याच विद्यार्थ्यांना 100 गुण मिळाले असून, सिद्धार्थ त्यामधील एक असून त्याने ऑल इंडिया स्तरावर अत्यंत उच्च स्थान मिळवले आहे. ही कामगिरी त्याच्या कठोर परिश्रम, एकाग्रता आणि चिकाटीचे फलित आहे.

सिद्धार्थ हा लोकसेवा ई-स्कूल व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी असून त्याने आपल्या शालेय जीवनात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत शिस्त, समर्पण आणि अभ्यासातील प्रामाणिकपणा जपला आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, योग्य नियोजन आणि स्वतःवरील विश्वास यामुळे त्याने हे यश संपादन केले.

या उल्लेखनीय यशामुळे त्याच्या कुटुंबासह संस्थेचा अभिमान वाढला असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही तो एक प्रेरणास्थान ठरला आहे.

लोकसेवा ई-स्कूल व ज्युनियर कॉलेजकडून सिद्धार्थचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Share this article
Shareable URL
Prev Post

लोकसेवा ई-स्कूलचा दहावीचा सीबीएसई बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल

Next Post

ढोल-ताश्याच्या गजरात विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा

Read next

अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा; आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

पुणे | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान…

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन

ओपन हार्ट शस्त्रक्रियेला जीवनरक्षक पर्याय ‘टीएव्हीआर’  पुणे | रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेने चीर,…

रविवारपासून माँ आशापुरा माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

अभिषेक, नवचण्डी महायज्ञ, भजन जैमिंगसह माता की चौकी व पुणे गॉट टॅलेंट कार्यक्रमांचे आयोजन पुणे । गंगाधाम चौक येथे…